सोमाटणे – शिरगाव येथील बी. के. बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन या शाळेने ग्रामीण भागातून निवासी शाळेतून सलग राज्यात चौथ्यांदा प्रथम क्रमांकाचे तसेच देशात दहाव्या क्रमांकाचे मानांकन मिळविले.
2020-21 चा मानांकनासाठी एज्युकेशन “वर्ड ऑफ इंडिया’तर्फे शाळेची नुकतीच पाहणी करून तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना पुरवलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ शालेय परिसर स्वच्छता विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा त्यांचा आहार व व्यायाम अद्ययावत असलेले शालेय दप्तर आदींसह अनेक बाबींची पाहणी केली.
यामध्ये शाळेने राज्यात प्रथम क्रमांकाचे तसेच देशात 10 व्या क्रमांकाचे मानांकन मिळवले. शाळेने सलग चार वेळा प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवले 2020-21 साठीच्या प्रथम मानांकनासाठी शाळेची निवड झाली आहे, अशी माहिती शाळेचे प्राचार्य एस. के. सान्याल यांनी दिली.
बी. के. बिर्ला या निवासी शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या सरकारच्या सर्व नियमांच्या पालन करून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले असून, 70 विद्यार्थी उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत. शाळेने विद्यार्थ्यांसाठी अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहायाने एकाच वेळी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाची सोय केली आहे.
पुढील महिन्यात पूर्ण शाळा सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळेतर्फे पूर्वतयारी म्हणून शाळा परिसर स्वच्छतेसाठी 105 सेवकांची नेमणूक केली आहे. आरोग्य तपासणीसाठी 4 डॉक्टर, 3 निवासी नर्स, अतिदक्षता विभागासाठी 20 रुमची सोय केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या निवासासाठी स्वतंत्र रूम, स्वतंत्र बाथरूम अशी सोय केली असल्याची माहिती सान्याल यांनी दिली.