पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) -विविध मागण्या करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या तसेच महापालिकेत सुरू असलेल्या खुलेआम भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने आज (दि. 24) महापालिकेवर जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला.
शहरात मोहल्ला (जिजाऊ) क्लिनिक सुरू करा, सर्व रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली जीवरक्षक व आवश्यक औषधे मोफत द्या, केस पेपर शुल्क माफ करा, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग सुरू करा, वायसीएममध्ये जळीत वॉर्ड त्वरित सुरू करा, सेंटर ऑफ एक्सलन्स मॉडेल शाळा सुरू करा, घरेलू महिला कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना कमी व्याजदरात कर्ज द्या, महिलांना मोफत प्रवासी सुविधा द्या, आदी मागण्या आपने केल्या होत्या. त्यातील एकही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला.
यावेळी अध्यक्ष चेतन बेंद्रे, अनुप शर्मा, राज चाकणे, यशवंत कांबळे, मनोहर पाटील, ज्योती शिंदे, संतोषी नायर, ब्रम्हानंद जाधव, मंगेश आंबेकर, स्मिता पवार, यल्लप्पा वालदोर, शुभम यादव, सरोज कदम, स्वप्नील जेवळे, गोविंद माळी, प्रवीण शिंदे, आशुतोष शेळके, अजय सिंह, रोहित सरनोबत, राजेश सापरे, ओमीन गायकवाड, अजिनाथ सकट, सुंदर ओव्हाळ, महेश पाटील, वहाब शेख, सुरेंद्र कांबळे, चंद्रमनी जावळे, सर्फराज मुल्ला, मीना जावळे, संजय मोरे, सचिन पवार, वाजीद शेख, संतोष राऊत, अशोक नांगरे, दमयंती नेरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.