पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना नवीन वर्षात एकूण 28 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. तर साप्ताहिक सुट्टी असलेल्या शनिवारी आणि रविवारी प्रत्येकी तीन सुट्टया अशा साप्ताहिक सुट्ट्यांचे दिवशी आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या सहा एवढी आह.
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्ट्यांना सुरुवात होत आहे त्यानंतर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 8 मार्चला महाशिवरात्री, 25 मार्चला होळी, 29 मार्चला गुड फ्रायडेला सुट्टी आहे.
एप्रिल महिन्यामध्ये पाच सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. यामध्ये नऊ एप्रिलला गुढीपाडवा, 11 एप्रिल रमजान ईद, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 17 एप्रिलला रामनवमी तर भगवान महावीर जयंतीची 21 एप्रिलला सुट्टी आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे तर बुद्ध पौर्णिमेची 23 मे रोजी सुट्टी आहे.
जून महिन्यात बकरी ईदची 17 तारखेला सुट्टी आहे. तर 17 जुलैला मोहरम निमित्त सुट्टी असणार आहे. आगामी वर्षातील स्वातंत्र्यदिनी पारशी नव वर्ष येत आहे. .याशिवाय 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी तर 16 सप्टेंबर ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. याला जोडूनच 17 सप्टेंबरला स्थानिक सुट्टयांमधील अनंत चतुर्दशीच्या एका सुट्टीचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण तीन सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. यामध्ये महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर, 12 ऑक्टोबरला दसरा तर 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशीची सुट्टी आहे.
आगामी वर्षातील नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक सुट्ट्या आहेत. या महिन्यात एकूण पाच सुट्ट्या आहेत. यामध्ये एक नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, दोन नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, तीन नोव्हेंबरला भाऊबीज तर 26 नोव्हेंबरला आळंदी यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. याशिवाय पंधरा नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी आह.े डिसेंबर महिन्यात केवळ ख्रिसमसची एकमेव सुट्टी आहे