Pimpri : अंदाजपत्रकात वैद्यकियसाठी तरतूदीचा उल्लेख नाही

पिंपरी : महापालिकेच्या अंदाजपत्रकात वैद्यकीय विभागासाठी कोणत्याही प्रकारची स्पष्ट तरतूद सांगण्यात आलेले नाही. त्यात फक्त नवीन प्रकल्प व योजनांचा संकल्प करण्यात आला आहे. तालेरा रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले असताना रुग्णालयातच २५० खाटांचे प्रसूतीकक्ष व बालरोग रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. असे सांगितले आहे.
डीएनबीसाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम
नवीन थेरगाव हॉस्पिटल आणि नवीन भोसरी हॉस्पिटलमध्ये डीएनबीसाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्त्रीरोग, बालरोग आणि भूलशास्त्र या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या रुग्णालायात औषध, ईएनटी (कान-नाक-घसा), शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक्स इत्यादी डीएनबी अभ्यासक्रमांसाठी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्याचबरोबर कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय आणि नवीन तालेरा रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र, औषध, ईएनटी, शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक्स इत्यादी डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.
हे आहेत नवीन प्रकल्प व योजना
– तालेरा हॉस्पिटलमध्ये युरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी विभाग
– महापालिकेच्या ४ नवीन रुग्णालयांमध्ये डायलिसिस युनिट
– सर्व महापालिका रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली
– शहरवासीयांसाठी सेकंडरी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन सुविधा
– एकूण ७० ठिकाणी शहरी आरोग्य केंद्रांसाठी पोर्टा केबिन
– नवीन थेरगाव रुग्णालयाला लागूनच पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्वावर पूर्ण सुसज्ज १०० बेड्सचे कॅन्सर हॉस्पिटल
– जुन्या तालेरा रुग्णालयात ३० बेड्सची जळीत वॉर्ड
– नवीन थेरगाव रुग्णालयात ट्रॉमा युनिट
उपलब्ध वैद्यकीय सेवा
१५ व्या वित्त आयोगांतर्गत १४ शहरी आरोग्य केंद्रे आणि ६ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत असून ही आरोग्य केंद्रे झोपडपट्टी भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात. नागरिकांना प्राथमिक स्तर रुग्णालये / प्रसूतिगृहे, सेकेंडरी रुग्णालय व क्षेत्रीय रुग्णालय अशा स्तरावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सरासरी वार्षिक रुग्ण संख्या अंदाजपत्रकात नमूद केली आहे.
सरासरी वार्षिक रुग्ण संख्या
– बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) – १६,१०,०४२
– आंतररुग्ण सेवा (IPD) – ८९,४१७
– सिड्रोरियन प्रसूती – ७,४३८
– सुलभ प्रसूती – ८,६२२
– शस्त्रक्रिया – ३३,१०७
– आयसीयू रुग्ण – ६,१३४
– एनआयसीयू रुग्ण – ३,६५१
– सोनोग्राफी – ८२,१२२





