पिंपरी : सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 13) उपचार सुरू असताना दोघा वृद्धांचा करोनाने मृत्यू झाला. रुग्णालयात 12 बाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
मृत्यू झालेले ज्येष्ठ हे दापोडी आणि थेरगाव येथील रहिवाशी होत. त्यांचे वय अनुक्रमे 60 आणि 62 वर्ष इतके होते. रुग्णालयातून आज करोनामुक्त झालेल्या दोन पुरुष रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये 54 वर्षीय पुरुषासह 70 वर्षीय ज्येष्ठाचा समावेश आहे.
पिंपळे गुरव, गणेशनगर येथील ते रहिवाशी आहेत. रुग्णालयात सध्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 28 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.