Pimpri : इंद्रायणी नदीपात्रात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह
Updated On:

देहूगाव : देहूगाव बोडकेवाडी येथील इंद्रायणी नदीपात्रामध्ये मंगळवारी (दि.18). सकाळी साडेदहाच्या सुमारास एका बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आला.
रोहित सुभाष टाक (वय 27, रा.नायडूनगर, झेंडेमळा, देहूरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आला.
रोहित टाक हा गुरुवारी (दि.13 ) रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार रोहितची आई सुनीता यांनी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी ( दि.16 ) नोंदवली होती.
तर सहा दिवसांनंतर रोहितचा मृतदेह इंद्रायणीनदीपात्रात आढळून आला. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोयेब शेख या प्रकरणी तपास करीत आहे.





