Pimpri : साजगाव येथील शिबिरात ११६ जणांकडून रक्तदान
Updated On:

खालापूर : साजगाव येथे महारक्तदान शिबिर पार पडले असून या शिबिरात एकूण ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या माध्यमातून साजगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये या विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात रक्ताचा असलेला तुटवडा लक्षात घेत संस्थानच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. रायगड ब्लड बँक आणि श्री साई ब्लड बँक न्यू पनवेल यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.





