Pimpri : चेतक ईव्ही टेस्टिंग विभागाला बजाज ऑटो विजेतेपद

पिंपरी : आकुर्डी येथील बजाज ऑटो क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर डिव्हीजनल क्रिकेट टुर्नामेंट बजाज ऑटो क्रिकेट स्पर्धा शनिवारी (दि. १) संपन्न झाली. स्पर्धेचा अंतिम सामना आर ॲण्ड डी. टी ॲण्ड व्ही विरुद्ध चेतक ईव्ही टेस्टिंग विभाग असा झाला. त्यामध्ये चेतक ईव्ही टेस्टिंग विभागाने हा सामना ३५ धावांनी जिंकून बजाज ऑटोचे २०२४-२५ चे विजेतेपद मिळविले.
या वर्षी ६४ संघांतील एकूण १,००० कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे संयोजन प्रशासन व एचआर अधिकारी अतुल काळोखे यांनी केले होते.
असा सामन्याचा निकाल
चेतक ईव्ही टेस्टिंग विभागाने दहा षटकात ४ बाद १०० धावा केल्या. जीवन कुमार २६, हितेश बडगुजर २३ , अभिषेक वर्मा २०, सिद्धार्थ ठाकूर २० अशा धावा केल्या. तर आर ॲण्ड डी. टी. ॲण्ड व्ही विभागाने ७.५ षटकात १० बाद ६५ धावा केल्या. प्लेअर ऑफ द मॅच मान जीवन कुमार (२६ धावा, दोन विकेट) याला देण्यात आला. बेस्ट बॅटसमॅन म्हणून सिद्धार्थ ठाकूर (१८६ धावा) याला सन्मानित करण्यात आले. तर बेस्ट बॉलर- काशिराम दांडले (१० विकेट), सिरीज ऑफ द प्लेअर – सिद्धार्थ ठाकूर (१८६ धावा, ५ विकेट) यांना गौरविण्यात आले.
पारितोषक वितरण समारंभ प्रसंगी आर ॲण्ड डी प्रमुख आर. नरसिंह म्हणाले की, या स्पर्धेचे आयोजन हे खेळाडूंच्या अंगीभुत गुणांना वाव देणारे असते; खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा. तसेच प्रशासन प्रमुख संजय खडसे यांनी मार्गदर्शन केले. समारंभाच्या शेवटी अतुल काळोखे यांनी व्यवस्थापन व खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.





