Pimpri : महिलांवरील अत्याचाराविरोधात चिंचवडमध्ये जनजागृती

पिंपरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी मोरया गोसावी मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांनी महिलांवरील अन्याय, सुरक्षा आणि स्वतंत्र्य या विषयांवर जोर देत प्रेरणादायी विचार मांडले.
यावेळी देवा श्री गणराया आता यांना बुद्धी दे, आपल्या मुलींप्रमाणे दुसऱ्यांच्या मुलींकडे बघा, महिला मुलीना सुरक्षितता द्या, मुलगी आहे समाजाची शान तिचा योग्य तो ठेवा सन्मान, मुली वाचवा मुली वाढवा, मुलांप्रमाणे मुलींनाही स्वातंत्र्य द्या, अशा संदेश फलकांद्वारे महिलांकडून परिसरात जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी विनया ब्रम्हे, सुनीता खडककर, नागरत्न अमृतकर, अनिता कांबळे, स्मिता पांडे, स्नेहल आगलावे, प्राजक्ता मोकार्शी, मानसी दामले, शुभदा राऊत, माधुरी कवी, स्मिता बारवकर, ज्योती वाडेकर, प्राजक्ता टेकवडे, सुमन माने, गिरिजा फराफ यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्षा पूजा सराफ यांनी केले होते.





