पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २४ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर याच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. चार प्रभागांसाठी १ असे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून ३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोग, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, निवडणूक विभागाचे उपायुक्त तथा नोडल अधिकारी यांच्या सूचना व आदेशानुसार तसेच महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार निवडणुकीचे सर्व कामकाज काटेकोरपणे पार पाडावे, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रभागानुसार नियुक्त केलेले अधिकारी प्रभाग क्रमांक – निवडणूक निर्णय अधिकारी – सहायक निवडणूक निर्णयक अधिकारी – कार्यालय १०, १४, १५ व १९ – पल्लवी घाटगे (उपजिल्हाधिकारी) – अविनाश डोईफोडे, निवेदिता घार्गे, वैशाली ननावरे – स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी १६, १७, १८ व २२ – हणुमंत पाटील (उपजिल्हाधिकारी) – रवींद्र कुलकर्णी, राजाराम सरगर, चंद्रकांत मुठाळ – ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव २, ६, ८ व ९ – हिम्मत खराडे (उपजिल्हाधिकारी) – अजिनाथ गजरे, सुनिलदत्त नरोटे, दशरथ कांबळे – क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी २५, २६, २८ व २९ – अनिल पवार (उपजिल्हाधिकारी) – महमंद पाप्पा सय्यद, आश्विनी गायकवाड, सुनिल शिंदे – ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणी ३, ४, ५ व ७ – दिप्ती सूर्यवंशी (उपजिल्हाधिकारी) – प्रविण ढमाले, तानाजी नरळे, सुर्यकांत मोहिते – कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी १, ११, १२ व १३ – नितीन गवळी (उपजिल्हाधिकारी) – मनिषा बोबले, अतुल पाटील, शिवाजी चौरे – सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल २१, २३, २४ व २७ – सुप्रिया डांगे (उपजिल्हाधिकारी) – हरिदास चाटे, विजय सोनवणे, हेमंत देसाई – ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव २०, ३०, ३१ व ३२ – अर्चना पठारे (उपजिल्हाधिकारी) – गौरी तेलंग, सतिश वाघमारे, सोहन निकम – मनपाचे कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल), शास्त्रीनगर, कासारवाडी