पिंपरी | रुग्णवाहिका नादुरूस्त; रुग्णाचा जीव टांगणीला

Updated On:
पिंपरी | रुग्णवाहिका नादुरूस्त; रुग्णाचा जीव टांगणीला

पिंपरी (प्रतिनिधी) – गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयात निघाली होती. पिंपरीतील स्वर्गीय इंदीरा गांधी पुलावर आल्यावर रुग्णवाहिका बंद पडली. पाऊण तासाने दुसरी रुग्णवाहिका आल्यावर रुग्णाला त्यामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवा सुरू केली. बीव्हीजी कंपनीच्या मदतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता या रुग्णवाहिका जुन्या झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने त्या रस्त्यातच बंद पडत असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पर्यायी रुग्णवाहिकेची सोय होईपर्यंत रुग्ण आणि त्याचे नातेवाइक यांचा जीव टांगणीला लागतो.

मंगळवारी दुपारी एका महिलेची प्रसुती चिंचवड येथील महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात झाली. प्रसुतीनंतर त्या महिलेला मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव होऊ लागला. यामुळे तिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय तालेरा रूग्णालयातील डॉक्‍टरांनी घेतली. त्यासाठी शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली.

तालेरा रुग्णालयाच्या आवारात असलेली शासनाची 108 क्रमांकाची रुग्णावाहिका गॅरेजमध्ये असल्याने पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयातील रुग्णवाहिका बोलविण्यात आली. या प्रक्रियेत बराच वेळ गेला. अखेर पिंपरीतील रुग्णवाहिकेतून महिलेला घेऊन वायसीएम रुग्णालयात नेण्यात येत होते. सोबत नवजात अर्भकही होते. ही रुग्णवाहिका पिंपरी पुलावर आल्यानंतर अचानक तिच्यामध्ये बिघाड झाला व ती पिंपरी पुलावर बंद पडली.

रुग्णहिकेतील महिला डॉक्‍टरने रुग्णाची विचारपूस करून पर्यायी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. तब्बल पाऊण तासानंतर वायसीएम रुग्णालयातून 108 क्रमांकाची दुसरी रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्ण आणि त्यांचे दोन नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागला होता.

आणखी संबंधित बातम्या

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

2026-10-07 08:39:47

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

2026-10-07 08:02:22

Pimpri : मध्यस्थीतून जुळले संसाराचे धागे; दोन मुलांसाठी पती-पत्नीचा सामोपचार

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

2026-10-07 07:56:08

SIR 2026: आम्‍हाला ते मतदानच नको...नागरिकांचा संताप

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

2026-10-07 07:40:38

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

Moshi hospital : मोशी रुग्णालय इमारतीचे ६५ टक्के काम पूर्ण; आरसीसी बांधकाम ९० टक्के झाल्याचा दावा

2026-09-30 07:51:29

Moshi hospital : मोशी रुग्णालय इमारतीचे ६५ टक्के काम पूर्ण; आरसीसी बांधकाम ९० टक्के झाल्याचा दावा