Pimpri : इंद्रायणी नदी घाट विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता
Updated On:

देहूगाव : येथील इंद्रायणी नदी घाट विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या पुढाकारातून कापूर ओढा ते जगतगुरू तुकाराम महाराज मंदिर या परिसरातील घाट विकासासाठी १९.९८ कोटी रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सध्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
दरम्यान हा प्रकल्प इंद्रायणी नदीच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच भाविक आणि पर्यटकांसाठी अधिक सुंदर आणि सुलभ अनुभव निर्माण करणार आहे.





