पिंपरी | भरधाव दुचाकीची दुभाजकला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी -भरधाव दुचाकीने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 18 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे घडला. रवींद्र कुमार नाहक (रा. नवले ब्रिज जवळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नाहक हा त्याचा मित्र सुनील अशोक नगरकर (वय 47, रा. वाकड) यांची दुचाकी (एमएच 14/एलडी 7096) घेऊन मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात होता. एसपीआरआयएनटी कंपनी समोर बाणेर येथे आल्यानंतर रवींद्र नाहक याने दुचाकी वेगात चालवली. त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात रवींद्र हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत





