Pimpri : मळवली येथील शर्यतीत धावले २०० बैलगाडे

कार्ला : मावळ तालुक्यात यामुळे पुन्हा एकदा भिर्रर्र आवाज घुमू लागला आहे. अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी बैलगाडा शौकिनांची मोठी गर्दी होत आहे. नुकतीच मळवली गावात खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय केदारी मित्रपरिवाराच्या वतीने छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
मळवलीतील छकडी बैलगाडा शर्यतीला परिसरातील बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली. यावेळी फायनलमध्ये आई ताजुबाई संघ व शरण्या बालगुडे जुगलबंदीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. बाबुराव वायकर, बंडा पडवळ व आशिष पडवळ जुगलबंदीने द्वितीय क्रमांक, शिवाजीराव टाकवे व वैष्णवी स्वामी गायकवाड यांना तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक सचिन काजळे, पंचम क्रमांक बंडा पडवळ व आशिष पडवळ, सोमनाथ गोडंबे यांनी मिळवला.
बैलगाडा शर्यतीला खासदार श्रीरंग बारणे, दीपक हुलावळे, शरद हुलावळे, राजू खांडभोर, अंकुश देशमुख, बाळासाहेब भानुसघरे, मारुती देशमुख, सुरेश गायकवाड, सागर हुलावळे, राम सावंत, विशाल हुलावळे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. छकडी बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जवळपास दोनशे बैलगाडा मालक, शौकीन सहभागी झाले होते.
विजेत्या बैलगाडा मालकाला दुचाकी आणि रोख रक्कम असे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीचे सूत्रसंचालन दिनेश पिंगळे, अजिंक्य बालगुडे, शांताराम ढाकोळ यांनी केले.





