Pimple Nilakh Accident – भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात घडली. ज्योती सुभाषराव देशमुख असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. संतोष शिशनारायण ढेबरे (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यश विजय देशमुख (वय २३, रा. बालेवाडी, पुणे) यांनी शनिवारी (दि. १४) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मावशी ज्योती देशमुख या मोपेडवरून जात असताना पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात आल्या असता भरधाव वेगातील ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.