पिंपळे गुरव, दापोडी परिसरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा

पिंपळे गुरव  – पिंपळे गुरव आणि दापोडी परिसरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. गणेश उत्सवामध्ये होणारा अनावश्‍यक खर्च टाळून उर्वरित रक्‍कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी दापोडी परिसरात गेल्या 50 वर्षापासून गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहेत. नरवीर तानाजी मंडळ हे सर्वात जुने गणेश मंडळ आहे. या मंडळाने यंदा वेगळेपणा जपत किल्ला टेकिंगचा हा देखावा सादर केला आहे. दर आठवड्यात 1 गड सर करण्याचा विक्रम तसेच यातून शिवाजी महाराज यांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. दत्ता च्रकपाणी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

दापोडी येथील समर्थ व्यायाम मंडळाचे यंदाचे 72 वे वर्ष असून या मंडळाचे गौरव कदम हे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष ईश्‍वर काटे व खजिनदार अक्षर तावरे तसेच निखिल काटे सैफ व शेख व प्रतिक पवार व गोवर्धन काटे आहेत. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत करण्यात आली आहे. मंडळाने यंदा श्री गणेशासमोर आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला आहे.

पिंपळे गुरव येथील श्री साईनाथ नगर मित्र मंडळाचे 15 वे वर्ष असून योगेश कदम हे अध्यक्ष आहेत. यावेळी सादर केलेला कटपुतली देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्री छत्रपती शिवाजी मंडळाने यंदा गणेश मूर्तीसमोर पांडुरंगाची मूर्ती साकारलेली आहे. मंडळाचे 31 वे वर्ष असून तानाजी कदम हे अध्यक्ष आहेत. भैरवनाथ तरूण मंडळाचे यंदाचे 23 वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने फुलांची सजावट केलेले आहे. मंडळाचे अध्यक्ष शंकर जगताप आहेत. माऊली जगताप, नवनाथ जांभुळकर, बबन कदम शिवाजी गवते, सुनिल देवकर आदी काम पाहात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.