Laxman Hake : पुण्यात एक अशी घडामोड काल घडली ज्याची राज्यभरात चर्चा होत आहे. पुण्यातील प्रभांग क्रमांक २ मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पूजा जाधव यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केल्यामुळे त्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि मराठा आरक्षण आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर ट्रोलर्सने धारेवर धरले होते. याविषयी त्यांचे पती धनंजय जाधव आणि पूजा जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून माझ्या विधानाचा विपर्यास केला असल्याचा दावा पूजा जाधव यांनी केला असून, ज्या टीकेचा उल्लेख सातत्याने केला जात आहे. ती मी केलीच नसल्याचे म्हटले आहे. यावर आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा जाधव आणि धनंजय जाधव यांचे लगा लगा लगा आणि मला बघा असे झाले आहे. तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरे यांनी काय काय वक्तव्य केली आहेत हे महाराष्ट्राने पाहिले आहे, अशा शब्दांत लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनापासून ते संभाजी ब्रिगेड, स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झालंय आणि आता कमाळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी हवी होती. मात्र ती मिळाली नाही म्हणून भाजपच्या चिन्हावरून निवडणूक लढवताय. मात्र जनता सजग आहे, असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. याशिवाय लक्ष्मण हाके यांनी पूजा जाधव हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी हैं, असे म्हणत मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, राजेश टोपे यांना इशारा दिला आहे. ओबीसी समाजाला सोडलं नाही. त्यामुळे आम्ही आहोच, तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहता, तुमच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी खोचक टीका केली आहे. काय म्हणाल्या पूजा जाधव? पूजा जाधव यांना पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे पूजा जाधव यांना आपली उमेदवारी माघारी घ्यावी लागली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मी स्वतः हिंदू आहे, हिंदुत्वासाठी काम करेल. आतापर्यंत झालेल्या चुकांबद्दल माफी मागते, जिथे भाजपला गरज आहे तिथं काम करणार आहे. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते, असे त्यांनी पत्रकार परिषद म्हटले आहे. जे काही घडले याची माहिती सांगताना त्या रडत होत्या. हेही वाचा : Vidya Balan: ना पार्टी, ना झगमग; विद्या बालनने साधेपणाने पॅपराझींंसोबत केला वाढदिवस साजरा