Sanjay Raut : “पिक्चर अभी बाकी है”; बावनकुळेंच्या ‘त्या’ फोटोनंतर संजय राऊतांनी शेअर केला मकाऊतील आणखी एक व्हिडीओ

Sanjay Raut : शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करून एकाच गोंधळ निर्माण केला होता. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. दरम्यान, आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊत यांनी सहा सेकंदाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर ‘पिक्चर अभी बाकी है’ असे लिहित संजय राऊतांनी बावनकुळेंना सूचक इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो ट्वीट केला होता. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना?’ असे ट्वीटवर संजय राऊतांनी लिहिले होते. तसेच, माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. ते जर मी पोस्ट केले, भाजपाचे दुकान बंद होईल, अही संजय राऊतांनी म्हटले होते.
An Evening in Macau..
मकाऊ की रातें..
पिक्चर अभी बाकी है..@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @supriya_sule pic.twitter.com/0QHRCRgWcQ— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2023
त्यानंतर आज संजय राऊतांनी मकाऊमधील कॅसिनोतील सहा सेकंदाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे. आजूबाजूला अनेक लोक खुर्चीवर बसलेली दिसत आहे. त्यामुळे व्हिडीओत काय आहे? हे अद्याप समोर आलं नाही. “मकाऊ की रातें… पिक्चर अभी बाकी है,” असे फोटोला कॅप्शन संजय राऊतांनी दिले आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी बुधवारी ( २२ नोव्हेंबर ) भाष्य केलं होतं. “फोटोच्या आधारे कुणाचीही प्रतिमा मलिन करता येत नाही. कुणी हा प्रयत्न केला असेल, तर त्याला लखलाभ आहे. गेल्या ३४ वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आहे. विधिमंडळात २० वर्षापासून आहे,” असे बावनकुळेंनी म्हटले होते.





