PhysicsWallah चा आयपीओ येणार, कंपनी उभारणार तब्बल ‘एवढे’ कोटी; सेबीकडे गुपचूप जमा केली कागदपत्रं

PhysicsWallah IPO | अनेक कंपन्या पैसा उभारण्यासाठी आयपीओचा मार्ग स्विकारत आहेत. आता लोकप्रिय एडटेक कंपनी फिजिक्सवाला (PhysicsWallah) देखील आयपीओच्या रेसमध्ये सामील झाली आहे. कंपनीने सुमारे 4,600 कोटी रुपयांचे इनीशियल पब्लिक ऑफर (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे गुपचूपपणे अर्ज सादर केला आहे.
फिजिक्सवाला ही देशातील सर्वात लोकप्रिय एज्यूकेशन-टेक स्टार्टअपपैकी एक आहे. तसेच, यूनिकॉर्न लिस्टमध्ये सहभागी असणारी देखील कंपनी आहे.
फिजिक्सवाला मध्ये वेस्टब्रिज कॅपिटल, GSV वेंचर्स, लाइटस्पीड वेंचर पार्टनर्स आणि हार्नबिल कॅपिटल यांसारख्या अनेक मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्म्सने गुंतवणूक केली आहे. आयपीओ आल्यास फिजिक्सवाला भारतीय शेअर बाजारात लिस्ट होणारा पहिला एडटेक स्टार्टअप असेल.
रिपोर्टनुसार, कंपनीने बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर SEBI कडे कागदपत्रं सादर केली आहेत. फिजिक्सवालाच्या आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्यासोबतच ऑफर फॉर सेल (OFS) चा देखील समावेश असेल. म्हणजेच, नवीन शेअर्स जारी करण्यासोबतच काही विद्यमान गुंतवणूकदार आपली हिस्सेदारी विकतील.
या आयपीओद्वारे मागील व्हॅल्यूएशन 2.8 अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्हॅल्यूएशन मिळवण्याची फिजिक्सवालाची योजना आहे. फिजिक्सवालाने या आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, एक्सिस बँक, जेपी मॉर्गन आणि गोल्डमॅन सॅक्स यांना बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.
दरम्यान, कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये हॉर्नबिल कॅपिटलच्या माध्यमातून 210 मिलियन डॉलर्स (₹1,750 कोटी) उभारले होते. फिजिक्सवालाची स्थापना अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांनी केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, त्याच्याकडे 55 लाखांहून अधिक पेड स्टुडंट्स आहेत. यूट्यूबवर त्याचे 4.6 कोटी सब्सक्रायबर्स आहेत. फिजिक्सवालामध्ये 14 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, देशातील विविध कोचिंग सेंटरमध्ये लाखो विद्यार्थी शिकत आहेत.





