प्रभात ग्रीन गणेशा-2019 : प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांचा संकल्प पिंपरी: स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवता येऊ शकते, हा आत्मविश्वास येताच शेकडो विद्यार्थ्यांनी बाप्पा मोरयाचा गजर करत आता यापुढे “आम्हीच बनविणार आमचे बाप्पा’ असा संकल्प केला. हे उत्साहपूर्ण दृश्य पहायला मिळाले दैनिक प्रभातच्या “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमातंर्गत भोसरी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये आयोजित कार्यशाळेत. भोसरी, इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळेत सहभाग नोंदवून उत्साही वातावरण आकर्षक आणि सुंदर गणेश मूर्तींना आकार दिला. आपल्या हाताने बनवलेली मूर्ती पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. #gallery-1 { margin: auto; } #gallery-1 .gallery-item { float: left; margin-top: 10px; text-align: center; width: 33%; } #gallery-1 img { border: 2px solid #cfcfcf; } #gallery-1 .gallery-caption { margin-left: 0; } /* see gallery_shortcode() in wp-includes/media.php */