#PhotoGallery: चिमुकल्या हातांनी साकारले बाप्पा

प्रभात ग्रीन गणेशा -2019 : पी.के इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडूच्या गणेशमूर्ती

पिंपरी (प्रतिनिधी) – शाडूच्या मातीपासून स्वत: बनवलेली गणेशमूर्तीचीच घरात प्रतिष्ठापना करु, असा संकल्प आज पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील पी.के इंटरनॅशनल स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी केला. जलप्रदूषण रोखण्यासाठी दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्‍या बाप्पांची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.

यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी दैनिक प्रभातच्या वतीने “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार (दि.30) रोजी पिंपळे सौदागर येथील पी.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये शाळेमधील इयत्ता 7वी, 8वी व 9 वीच्या 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिल्पकार नितीन ठाकरे व त्यांच्या टीमने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे विविध टप्प्यात अगदी कमी वेळाता आकर्षक आणि सुंदर अशी गणरायाची मूर्ती बनवली. अगदी कमी वेळात केलेली गणरायाची मूर्ती पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता याच मूर्तीची आपल्या प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प बोलून दाखवला व इतरांनाही पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बसविण्याचे आवाहन केले.

यावेळी दैनिक प्रभातचे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, प्रशासकीय व्यवस्थापक प्रवीण थूल व पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय प्रमुख शिरीष समुद्र यांनी पी.के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक चेअरमन जगन्नाथ काटे यांचा मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता परळ, सविता आंबेकर, शिल्पा गायकवाड, निर्मला द्विवेदी, कार्तिकला गायकवाड, राहुल पोरे, राखी पोरेल, सयाजी शिंदे, शीतल पाटील, अंकिता बेनाके, माधुरी निकम, पूजा राठोड, स्वाती दुरगुडे आदींची उपस्थिती होती.

मुलांसोबत गणेशमूर्ती बनवण्याचा आनंद वेगळाच या कार्यशाळेत शिक्षकांनीही सहभाग घेऊन शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मुलांसोबत गणेशमूर्ती बनवण्याचा अनुभव अणि आनंद वेगळाच होता. दैनिक “प्रभात’ने या उपक्रमाच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल शिक्षकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले.

प्रतिक्रिया
बालवयातच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गोडी लागावी, यासाठी अशा कार्यशाळेची आवश्‍यकता असते. दैनिक “प्रभात’ने आमच्या शाळेत या कार्यशाळेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व सांगितले, तसेच त्यांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षणही दिले. त्यामुळे, शाळेतील हे विद्यार्थी आता दरवर्षी हा उपक्रम राबवतील शिवाय इतरांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रह धरतील. आम्हीही या कार्यशाळेत बनवलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करणार आहोत.
– जगन्नाथ काटे, संस्थापक चेअमरन, पी.के इंटरनॅशनल स्कूल

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)