फलटण -फलटण तालुक्यातील 40 जणांचे करोना अहवाल सोमवारी (दि. 20) पॉझिटिव्ह आले असून तालुक्यामधील करोनाची वाटचाल व्दिशतकाकडे चालली आहे. आता सर्व नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळून आपल्याला आता करोना बरोबर जगता आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया फलटणकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सुरवातीच्या काळात अगदी तुरळक प्रमाणात रुग्ण फलटण तालुक्यामध्ये आढळून आले. फलटण शहरामध्ये तर एकही रुग्ण आढळून आला नाही. पुणे व मुंबई येथे संपर्क आला त्यांनाच फलटणमध्ये करोनाची लागण झाली असल्याचे समोर येत होते. परंतु, आता फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोनाने आपले हातपाय पसरले असून आता नागरिकांनी स्वतःची स्वतः काळजी घेणे, अत्यंत महत्वाचे आहे.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोनाचे 40 नवीन रुग्ण सापडल्याने हाहाकार उडाला. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या सुमारे 190 च्या घरात पोहचली आहे. काल (दि. 20) रोजी करोनाचे 40 अहवाल पॉझिटिव्ह आले असून मौजे विंचुर्णी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 13, 20 व 21 वर्षांची मुले, 40, 40, 45 व 70 वर्षांच्या महिला आणि 10, 17, 19, 19, व 22 वर्षांच्या मुली (एकूण 12) यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
शहरातील गोळीबार मैदान येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 38, 43, 46, 55 व 58 वर्षीय पुरुष अशा 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवार पेठेतील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 60 वर्षीय संपर्कातील पुरुष पॉझिटिव्ह आला आहे.
लक्ष्मीनगर येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 19 वर्षांचा मुलगा 42, 45 व 49 वर्षांचे पुरुष व 40 वर्षांची महिला असे 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. मौजे मिरढे येथील 45 वर्षीय पुरुष, मौजे मलठण येथील 27 वर्षीय महिला व 70 वर्षीय पुरुष, मौजे सासवड येथील 25 वर्षीय महिला, मौजे रावडी खुर्द येथील 34 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
खामगाव येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 62, 24, 52,25,22,70 व 26 वर्षीय पुरुष आणि 55, 45 व 20 वर्षीय महिला अशा एकूण 10 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. साखरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, मौजे सासवड येथील 24 वर्षीय महिला यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांच्या निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
करोनाच्या बाबतीत आपण स्वतः आत्मनिर्भर होणे एवढेच आपल्या हातात असून आगामी काळामध्ये करोनाची लस उपलब्ध होईपर्यंत तरी शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे एवढेच आता फलटणकर नागरिकांच्या हातात आहे. सध्या फलटण तालुक्यामधील करोनाची वाटचाल व्दिशतकाकडे चालली आहे.
आणखी दोन पॉझिटिव्ह
फलटण येथील लक्ष्मीनगर आणि तुकाईनगर पाडेगाव येथील प्रत्येकी एक जणाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती मंगळवारी मिळाली. लक्ष्मीनगर फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील 45 वर्षांच्या पुरुषाची चाचणी रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.
मौजे तुकाईनगर, पाडेगाव येथील 25 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.