“माझ्यावर लोकांचा विश्वास, बदनामीच्या राजकारणाला…”; रोहित पाटलांचे संजयकाका पाटलांना प्रत्युत्तर

Rohit Patil | विधानसभा निवडणुकीपूर्वीच सांगलीत राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीनिमित्त रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून तीन हजार रुपये वाटत असताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. यावर आता रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पाटील म्हणाले, ‘काल तासगावमधील घटनेत माझं नाव घेण्यासाठी पराकोटीचे दडपण संबंधित व्यक्तीवर टाकले याची माहिती आम्हाला मिळाली. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अशापद्धतीचा प्रकार संजयकाका पहिल्यांदा करत नाही. ते कुठल्या पातळीला जातील हे लोकांना माहित आहे आणि माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे.” Rohit Patil |
“पाच वर्षे काम करणाऱ्याला अशा गोष्टी करायची गरज नसते. मी पाच वर्षे काम केले आहे हे लोकांना माहित आहे. अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण कोण करत आहे हे लोकांना माहित आहे लोक त्यांना उत्तर देतील,” असं प्रत्युत्तर रोहित पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिले. Rohit Patil |
संजय काका पाटील काय म्हणाले होते?
संजय काका पाटील म्हणाले, ‘अतिशय निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहित मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.’ दरम्यान, रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. यामुळे मोठ्या संख्येने संजय काका गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनजवळ जमले होते.
हेही वाचा :
MVA चा बंडखोरांना अल्टिमेटम ! उद्धव ठाकरे म्हणाले,’कारवाई करू’ ; शरद पवार काय म्हणाले?





