Rahul Gandhi : द केरला स्टोरी २ हा चित्रपट रिलीज होऊन काहीदिवस पूर्वी झाले आहेत. चित्रपट रिलीज होण्याअगोदर त्याच्यावर वादाचे ढग निर्माण झाले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यात येईल असे दिसत होते. मात्र, मोठ्या वादानंतर अखेर हा चित्रपट रिलीज झाला. द केरला स्टोरी २ या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाचे बॅाक्स अॅाफिसचे आकडे फार काही कमाल करु शकलेले नाहीत. आता या चित्रपटावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य करत सडकून टीका केली आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी ‘ चित्रपट हिट ठरला आणि बॅाक्स अॅाफिसवर तुफान कमाई चित्रपटाने केली. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच चित्रपटाची चर्चा होती. मात्र, पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग मागे पडला आहे. या चित्रपटावर राहुल गांधी यांनी केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाष्य केले आहे. इडुक्की येथील मारियान कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्याने चित्रपटाचा वापर प्रचारासाठी करण्याबाबत राहुल गांधी यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “एक आनंदाची बातमी म्हणजे ‘द केरला स्टोरी २’ पाहण्यासाठी कोणीही जात नाहीये. चित्रपटगृहे रिकामी आहेत. यावरून हेच कळतं की देशातील बहुसंख्य जनतेला केरळची संस्कृती आणि परंपरांची योग्य समज आहे. लोक अशा द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींना बळी पडत नाहीत.” पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्याच्या काळात चित्रपट, टेलिव्हिजन आणि प्रसारमाध्यमांचे ‘शस्त्रीकरण’ केलं जात आहे. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी, विशिष्ट समुदायांची बदनामी करण्यासाठी आणि समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा चित्रपटांचा वापर केला जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. ठराविक लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी इतरांना लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. द केरला स्टोरी २ चित्रपटाची कथा तीन हिंदू तरुणींभोवती फिरते. ज्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. राजस्थान आणि केरळमधील घटनांचा संदर्भ कथेत देण्यात आला आहे. हेही वाचा : Iran on Donald Trump: “जहाज सोडा, एक लिटरही तेल देणार नाही” ; अमेरिकेच्या धमकीवर इराणचे थेट प्रत्युत्तर