Chitra Wagh : कातडी सोलून काढा… फासावर द्या…; त्या फोटोंवरून चित्रा वाघ आक्रमक; आका आकाचे आका म्हणत केले सूचक विधान

पुणे: देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी हैवान असल्याचे दिसत आहेत. या फोटोंवरून आरोपींनी देशमुख यांची हत्या करताना क्रूरतेची परीसीमा ओलांडल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून कोणीही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. इतक्या भयानक पद्धतीने आरोपींनी देशमुख यांची हत्या केली आहे.
या व्हायरल फोटोनंतर आता देशमुख यांच्या मारकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहेत. यावर आता विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या, अशी मागणी केली आहे.
तसेच त्या पुढे असही म्हणाल्या की, जनावर पण असा बळी घेत नाही एखाद्याचा आक्का आकाचे आका आणि कोण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतले असतील तर तेही उचलून बाहेर फेकून द्या, असे म्हटले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये आक्का आकाचे आका असा उल्लेख केल्याने त्यांचा रोख नेमका कोणत्या आकाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या.
जनावर पण असा बळी घेत नाही एखाद्याचा.आका,आकाचे आका आणि कोण कोण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतले असतील तर तेही उचलून बाहेर फेकून द्या.
माणसं नाहीतचं ही..हे तर हैवान….
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 4, 2025
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या. जनावर पण असा बळी घेत नाही एखाद्याचा. आका,आकाचे आका आणि कोण कोण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतले असतील तर तेही उचलून बाहेर फेकून द्या. माणसं नाहीतचं ही..हे तर हैवान….अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे राजीनामा देण्याचे आदेश
देशमुख हत्या प्रकरणातील फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला जात आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात नमूद केले आहे. यामुळे आता विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात काल रात्री उशिरा मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या हत्या प्रकरणी मुंडेंच्या अडचणी वाढल्या असून मुंडे राजीनामा देणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





