प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सोसायट्यामध्ये दौऱ्यांच्या माध्यमातून प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे. सोसायटी दौरा म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी थेट ऐकून घेत आणि त्यावर कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. सोसायटीत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना गांभीर्याने समजून घेत, त्वरित किंवा टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्याची भूमिका या दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून येते. उमेदवार रुपाली आल्हाट, अश्विनी जाधव, विशाल आहेर आणि वसंत बोराटे हे या दौऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. हा दौरा कोणत्याही मंचावरून भाषण करण्यासाठी नाही, तर घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधण्यासाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असोत, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न असोत किंवा युवकांच्या अपेक्षा असोत, प्रत्येक मुद्द्यावर थेट चर्चा करून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. लोकांसोबत चालत, लोकांच्या प्रश्नांमधून मार्ग काढणं आणि शब्दांपेक्षा कामाला प्राधान्य देणं हाच या सोसायटी दौऱ्यामागचा खरा उद्देश आहे. कारण नेतृत्व हे दिसण्यात नाही, तर जबाबदारी निभावण्यात दिसत असल्याचे मत वसंत बोराटे यांनी व्यक्त केले.