प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – वाकड, कावेरीनगर पिंपळे निलख, कस्पटेवस्ती, विशालनगर प्रभाग क्र.२६ मधील भाजपाच्या उमेदवारांनी आज प्रचारप्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते वाकड येथील म्हातोबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ केला.प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शखाली संपूर्ण पँनेल मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला. यावेही पॅनल प्रमुख सचिन साठे, प्रचार प्रमुख विशाल कलाटे, वसंत कलाटे, विठ्ठल कलाटे, बजरंग तात्या कलाटे, संपत विनोदे, मोहन भुमकर, आनंदा मानकर, तानाजी शेडगे, संभाजी कलाटे, सुरेश कलाटे, सोमनाथ काटे, बाळासाहेब कलाटे, राजाभाऊ मासुळकर, नंदुशेठ बालवडकर, पांडुरंग शेडगे, भगवान शेडगे, तानाजी शेडगे, शिवाजी आगळे, खंडू कलाटे, विष्णू कस्पटे, विजय कस्पटे, सचिन कलाटे, नितीन कलाटे, अमोल कलाटे, विनायक कलाटे, विजय कलाटे, उत्तम कलाटे, किरण कस्पटे, नरेंद्र बरडे यांच्यासह एकता ज्येष्ठ नागरिक मंडळ वाकडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा प्रभाग शहरातील अतिशय महत्वाचा प्रभाग असून झपाट्याने विकसित झाला आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांच्या मुलभुत हक्कासाठी तथा विकासाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करण्यासाठी मतदार ताकदीने भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतांचा हक्क बजावतील, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उमेदवार विनायक गायकवाड, आरती चौंधे, स्नेहा रणजित कलाटे व संदीप कस्पटे या चारही उमेदवारांनी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन जेष्ठांचे आशिर्वाद घेतले. यावेळी फटाक्याची आतीषबाजी गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद .. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर वाकड गावठाण,वाकड चौक, उत्कर्ष चौक, सम्राट चौक, वेणु नगर, कावेरी नगर, पिंक सिटी रोड, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, धनराज पार्क परिसरातून काढलेल्या पदयात्रेला अथांग जनसागर लोटला होता. मानकर चौकात हालगी ताशांच्या निनादात या रॅलीचा समारोप करण्यात आला. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे औक्षण व पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले.