PCB Chairman Mohsin Naqvi India Visit : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेट वर्तुळात एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी हे भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण क्रिकेट संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी आल्याने क्रीडा जगतात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. अहमदाबादमध्ये आयसीसीच्या (ICC) महत्त्वाच्या बैठका होणार असून, याच दरम्यान नक्वी यांच्या संभाव्य भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवर पुन्हा एकदा खल सुरू झाला आहे. अहमदाबादमध्ये रंगणार आयसीसीच्या बैठका – आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीची (CEC) आभासी (व्हर्च्युअल) बैठक २१ मे रोजी होणार आहे. त्यानंतर ३० आणि ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये आयसीसी बोर्डाची समोरासमोर बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच काळात अहमदाबादमध्ये आयपीएल २०२६ चा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. आधी ही बैठक मार्च-एप्रिल दरम्यान कतारची राजधानी दोहा येथे होणार होती. मात्र, पश्चिम आशियातील संकटामुळे आयसीसीने ही बैठक भारतात हलवण्याचा निर्णय घेतला. मोहसिन नक्वी यांच्या दौऱ्यावर सस्पेन्स – Break – Mohsin Naqvi has been invited to Ahmedabad for the crucial ICC Board meetings on May 30-31. Given the massive diplomatic stakes, Pak PM Shehbaz Sharif will make the final executive call next week — Rohit Juglan (@rohitjuglan) May 16, 2026 पीसीबीचे अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्वी यांनी आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहणे स्वाभाविक आहे. परंतु, भारत-पाकिस्तानमधील सध्याचे राजकीय संबंध पाहता त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तानी मीडियाच्या दाव्यानुसार, नक्वी यांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. मात्र, भारताकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. नक्वी हे पीसीबी अध्यक्षांसोबत पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्षही आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. हेही वाचा – Hardik Pandya Marriage : IPL च्या रणधुमाळीत हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा थाटणार संसार? २२ मे रोजी ‘या’ ठिकाणी माहिकासोबत घेणार सात फेरे ट्रॉफी विवादामुळे आधीच वाढलाय तणाव – दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच दुबईतील आशिया कप फायनलदरम्यान झालेल्या एका वादामुळे अधिक बिघडले आहेत. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. या अपमानानंतर नक्वी ट्रॉफी आणि मेडल घेऊन स्टेडियमबाहेर पडले होते. त्यानंतर बीसीसीआयने ही ट्रॉफी परत मागितल्याने हा वाद आयसीसीपर्यंत पोहोचला आहे. आता अशा परिस्थितीत नक्वी स्वतः भारतात येतात की अन्य कोणाला प्रतिनिधी म्हणून पाठवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.