PBKS vs MI : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 58 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (PBKS vs MI) यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. मुंबईचे या सिझनमधील आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. तर पंजाबला प्ले ऑफ मध्ये (PBKS vs MI) स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्वाचा होता. मात्र या सामन्यात त्यांचा पराभव झाल्याने त्यांची प्लेऑफची वाट अजून खडतर बनली आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाबला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबची (PBKS vs MI) सुरुवात थोडी अडखळत झाली. प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्ला उमरझाई वगळता बाकी फलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. PBKS vs MI पंजाबकडून प्रभसिमरन सिंग याने ५७ धावा केल्या तर अझमतुल्ला उमरझाई याने ३८ धावा करत संघाची धावसंख्या २०० पर्यंत नेली. या सामन्यात पंजाबने २० ओव्हरमध्ये २०० धावा केल्या. तर मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ४, दीपक चहरने २, राज बावा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली.मात्र पावरप्लेनंतर मुंबई आपल्या सुरुवातीच्या ३ विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे काही काळ हा सामना पंजाबच्या बाजूने झुकला होता मात्र तिलक वर्माने शेवटपर्यंत झुंज देत मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तिलक वर्माने नाबाद ७५ धावा केल्या. तसेच रायन रिकलटनने ४८, रोहित शर्माने २५, विल जॅकने नाबाद २५ तर शेरफेन रदरफोर्डने २१ धावा करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. तर पंजाबकडून अझमतुल्ला उमरझाई याने २ तर मार्को जानसेन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली. या सामन्यात पंजाबचा पराभव झाल्याने त्यांची प्लेऑफची वाटचाल अजून खडतर झाली झाली. त्यांचे १२ सामने झाले असून त्यांना पुढील सामने कोणत्याही परीस्थितीमध्ये जिंकावे लागणार आहेत. तरच त्यांना प्ले ऑफमध्ये संधी मिळू शकते. त्यांनी २ पैकी १ सामना गमावला तर त्यांना बाकी संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.