LSG vs PBKS Shreyas Iyer Century Punjab Win : आयपीएल २०२६ च्या ६८ व्या कमालीच्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर ७ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या संघाने २० षटकांत ६ बाद १९६ धावांचा आव्हानात्मक स्कोर उभारला होता. मात्र, प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने कर्णधार श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य अवघ्या १८ षटकांत सहजरीत्या पार केले आणि आपला प्ले-ऑफचा दावा मजबूत केला. जोश इंग्लिसचे ७२ धावांचे योगदान; लखनऊचा डाव १९६ वर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात जोश इंग्लिसने १६ धावा कुटल्या खऱ्या, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शीन कुलकर्णी ‘गोल्डन डक’ (शून्य धावा) वर बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरनही ७ चेंडूंत फक्त २ धावा करून तंबूत परतल्याने लखनौची अवस्था २ बाद २० अशी झाली होती. PUNJAB KINGS NEED 3 RUNS. SHREYAS IYER BATTING ON 95*. CAPTAIN SMASHED A SIX TO HUNDRED & VICTORY 🥶 pic.twitter.com/YqUVAHnWlh — Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2026 यानंतर जोश इंग्लिस आणि आयुष बडोनी यांनी २३ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. बडोनी १८ चेंडूंत ४३ धावांची वेगवान खेळी करून बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि इंग्लिस यांच्यात ४३ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी झाली. लखनौसाठी सर्वाधिक धावा जोश इंग्लिसने केल्या; त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली, ज्यामुळे लखनौला १९६ धावांपर्यंत पोहोचता आले. पहिल्याच बॉलवर झटका; पण श्रेयस अय्यर-प्रभसिमरनचे शतकीय वादळ! प्रत्युत्तरात १९७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवातही धक्कादायक झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर प्रियांश मोहम्मद शमीच्या चेंडूवर ‘गोल्डन डक’चा शिकार झाला. त्यानंतर कूपर कोनोलीही १८ धावा करून बाद झाल्याने पंजाबचा संघ संकटात सापडला होता.मात्र, येथून कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह यांनी संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. या दोन्ही फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांची धुलाई करत तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ७६ चेंडूंत १४० धावांची अवाढव्य भागीदारी रचली. प्रभसिमरन ३९ चेंडूंत ६९ धावांची शानदार खेळी करून बाद झाला. हेही वाचा – Jasprit Bumrah Injury : १३ सामन्यांत फक्त ४ विकेट्स! जसप्रीत बुमराहच्या फ्लॉप कामगिरीमागचं खरं कारण आलं समोर ५१ चेंडूंत नाबाद १०१ धावा! 🚨 MAIDEN IPL HUNDRED FOR CAPTAIN SHREYAS IYER 🚨 Shreyas Iyer smashed a Marvelous Hundred in just 51 balls in a must win game for Punjab Kings in this run chase. – What a Remarkable Hundred by Captain Shreyas Iyer! 🫡 pic.twitter.com/DmehtB9QPd — Tanuj (@ImTanujSingh) May 23, 2026 दुसऱ्या बाजूने कर्णधार श्रेयस अय्यरने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ ५१ चेंडूंत नाबाद १०१ धावांचे झंझावाती शतक ठोकले. या कप्तानी खेळीत त्याने ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार लगावले. या अद्भूत विजयासह पंजाब किंग्सने दोन मौल्यवान गुण मिळवले असून ते अजूनही प्ले-ऑफच्या शर्यतीत भक्कमपणे टिकून आहेत.