पवार विरुद्ध पवार ! अजित पवार गटाचा पक्ष आणि चिन्हावर दावा.. शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केली ‘ही’ मागणी

मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. अशात आज निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी शरद पवार हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले.
आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असं म्हणत जयंत पाटील (jayant patil) यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे अजित पवार गटाच्या वकिलांनी यावेळी निवडणूक आयोगासमोर मांडले.पक्ष घटनेचं पालन होत नाही असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. जेष्ठ वकील मणिंदर सिंह यांनी अजित पवार गटाकडून युक्तिवाद केला.दोन तासांचा युक्तिवाद आजच्या दिवशी पार पडली आहे.
अजित पवार गटाने शिवसेना फुटीचा दाखल देत संख्याबळ जास्त असणाऱ्यांना चिन्ह मिळालं तसेच ते आम्हाला मिळावं अशी मागणी केली.त्यावर प्रतियुक्तीवाद करत शरद पवार गटाने निर्णय होईपर्यंत पक्षाचं चिन्ह गोठवू नका आमच्याकडेच ठेवा अशी मागणी आयोगाकडे केली. तब्बल दोन तास ही सुनावणी पार पडली. निवडणूक आयो आता यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. दोन्हही गटांना बाजू मांडण्यासाठी पूर्णपणे संधी मिळेल अशी टिपण्णी देखील यादरम्यान निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. आजची सुनावणी संपली. पहिल्या दिवसाची सुनावणी संपल्यानंतर पुढील सुनावणी सोमवारी (९ ऑक्टोबर) रोजी होणार आहे.
2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला अजित पवार गट सत्तेत सामिल झाला. दुसरीकडे शरद पवार गटाने विरोधी पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाध्यक्ष पदी अजित पवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाली.यावेळी शरद पवारांसह त्यांचे वकील देखील हजर होते.





