Pavana River Road – चिंचवडगाव परिसरात महापालिकेने पवना नदीकिनारी १८ मीटर रस्ता विकसित केला आहे. या रस्त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जागेपैकी जागामालक देवराम गावडे यांनी महत्वाची आणि मोक्याची जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागणार आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नदीकिनारी १८ मीटर रूंदीचा रस्ता विकसित केला आहे. तसेच नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर येऊन रस्त्याचे नुकसान होऊ नये म्हणून सिमाभिंतही बांधली आहे. त्यापैकी माणिक कॉलनीजवळील साडेसोळा गुंठ्याची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नव्हती. त्यामुळे येथील रस्ता तयार होऊनही काही जागेअभावी या रस्त्याचा वापर करता येत नव्हता. पिंपरी चिंचवड महापालिका मात्र जागा मालक देवराम गावडे यांनी नुकतीच ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी प्रपत्र ब महापालिकेस दिले आहे.ही जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी, यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र गावडे हे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. आता जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने त्यांच्या या प्रयत्नाना यश आल्याची चर्चा चिंचवडगाव परिसरात सुरू आहे.याबाबत बोलताना जागामालक देवराम गावडे म्हणाले की, सध्या चिंचवड परिसरात एक गुंठा जागेचा भाव सुमारे ७० लाख रुपये इतका सुरू आहे. मात्र महापालिका नियमानुसार २५ लाख रुपये प्रतिगुंठा जागेसाठी देत आहे. जागेचा मोबदला रोखीने द्यावा, अशी आमची मागणी हेाती. मात्र तीन गुंठ्यांच्या वरील जागेसाठी रोखीने पैसे देता येत नसल्याने महापालिकेने टीडीआर देण्याचे कबुल केले आहे. आगामी दहा वर्षांत कधीही जागामालक टीडीआर घेऊ शकतात. लोकहित पाहता सदरची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय आम्ही गावडे कुटुंबियांनी घेतला आहे. चिंचवडगावातील नदीकिनारी असलेल्या १८ मीटर रस्त्याची जागा ताब्यात यावी यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. देवराम गावडे यांनी ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्याने येथील रस्त्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. उर्वरित जागाही ताब्यात यावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे. – राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक (सिंगल फोटो वापरावा)