पवना धरणातूनही विसर्ग वाढवला
Updated On:

पवनानगर- पावसाने गेल्या तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात पुन्हा दमदार पुनरागमन केले. पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
दमदार पावसामुळे मावळातील बहुतांश धरणे तुडूंब भरली आहेत. लोणावळा खंडाळ्यासह मावळात कोसळणाऱ्या कोसळधारमुळे मावळासह पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले.
धरणातून 5 हजार 550 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. लोणावळ्यात मागील 24 तासांत 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.




