Pimpri : माय माऊली प्रतिष्ठानची गरजू विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप

हिंजवडी : शिक्षण क्षेत्रात झगडणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करणाऱ्या गरजू व गुणवंत विद्यार्थिनींच्या पाठीवर माय माऊली प्रतिष्ठानने कौतुकाची थाप देत त्यांना शिष्यवृत्ती आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. स्व. गजराबाई निवृत्ती विनोदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष होते. कार्यक्रमात मनपा कन्या शाळेतील विद्यार्थिनींना निवडण्यात आले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असूनही त्यांनी उच्च गुण मिळवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. या विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला.
मनपा शाळेतील विद्यार्थीनींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्या अर्धवट शिक्षण सोडून आपल्या स्वप्नांचा पाठलाग थांबवतात. अशा प्रतिभावान गरजू मुली शिक्षणापासून दुरावू नयेत, या सन्मानामुळे त्यांचे प्रोत्साहन वाढावे, इतर विद्यार्थिनींनीही त्यातून प्रेरणा घ्यावी, या हेतूने दरवर्षी शिष्यवृत्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजक बाळासाहेब विनोदे यांनी दिली.
या सन्मान सोहळ्याला श्री संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब विनोदे, माजी संचालिका कुंदा विनोदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या प्रा. भारती विनोदे, माजी संचालक दिलीप दगडे, अंकुश उभे, भाऊसाहेब पानमंद, सुभाष राक्षे, पांडूरंग साखरे, भरत आल्हाट, रमेश वाकडकर, शंकर वाकडकर, बाळासाहेब भुमकर, दतात्रय पापळ, यशवंत साखरे, अभिजित येळवंडे, मयुर मोडक, राजेंद्र विनोदे, संतोष विनोदे, पंडीत विनोदे, आनंदा विनोदे, मोहन विनोदे, सुरेश विनोदे, शांताराम विनोदे, संभाजी विनोदे, श्रीरंग साखरे, ज्ञानोबा वाकडकर, सुदाम वाकडकर, अरूण वाकडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. मुरलीधर पंडीत व शिष्यगणांचे हरिभजन, तसेच निखिल विनोदे व प्रसाद विनोदे यांच्या संयोजनातून कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन ह.भ.प. काळुराम साखरे यांनी केले.
गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान
सन २०२३-२४ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींची नावे खालीलप्रमाणे:
आफ्रिन शेख ८६.७ (पहिली)
स्वाती चौरे ९५.२ (दुसरी)
नंदिनी होळगीर ९८.५ (तीसरी)
तन्वी सुरवसे ९४.८ (चौथी)
आराध्या म्हस्के ९२.२ (पाचवी)
प्रीती पवार ८५.२ (सहावी)
शेजल पोटवडे ९६.५ (सातवी)
गायत्री साखरे ९२.८० (विशेष सन्मान)
याशिवाय, शिक्षिका वंदना यादव आणि स्वाती जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.





