सोमेश्वरनगर : बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाव्दारे वडगाव निंबाळकर पोलीस ,आरोग्य कर्मचारी ,ऊसतोड कामगार ,पेट्रोल पंप कामगार ईत्यादीना एक एक लिटर शुद्ध सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या त्यांच्या सेवेचे कौतुक करण्यात आले .
पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप सोमेश्वर कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव ,वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे ,पोलीस हवालदार महेंद्र फणसे ,ए एस आय जाधव यांचेसह आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी ,पेट्रोल पंप कामगार ,ऊसतोड कामगार यांच्यासह अनेकाना यावेळी प्रत्येकी एक लिटर शुद्ध सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले .
प्रास्तावीक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी केले. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यानी केले . यावेळी पत्रकार दत्ता माळशिकारे ,चिंतामणी क्षीरसागर,युवराज खोमणे,तुषार धुमाळ,विनोद गोलांडे ईत्यादी मान्यवर हजर होते. आभार हेमंत गडकरी यानी मानले .