‘रुग्ण हक्क परिषद’ शरद पवारांना 3000 पत्र लिहिणार – उमेश चव्हाण

आळंदी – दोन वर्षांच्या करोनाकाळात बाहेर फिरणे अवघड झाले होते. आरोग्य सेवेची उणीव भासत होती. देशात, राज्यात आरोग्य सेवा कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्याच्या सरकारने राहिलेली अडीच वर्ष आरोग्य सेवेसाठी समर्पित करावीत. देशात विविध कायदे आहेत. तसेच डॉक्टरांसाठी कायदा आहे. पण रुग्णांच्या हितासाठी कायदे होणे गरजेचे आहे. यासाठी शरद पवार यांना 30 हजार पत्रे पाठविणार असल्याचे रुग्ण हक्क परिषदे चे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.
राष्ट्रीय रेड्डी यलम संस्था आळंदी येथे रुग्ण हक्क परिषदे तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, काही हॉस्पिटलमध्ये होणारे गैरप्रकार, रुग्णांची लूट याला आळा बसण्यासाठी रुग्णांच्या हिता करता कायदा व्हायला हवा. त्या कायद्यात योग्य अश्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी समाजातील विकासाच्या दृष्टीने महत्त्व पूर्ण कार्य केले आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान आहे. ते स्थान पाहूनच त्यांना पत्रलेखन करणार आहोत.





