Pathaan 2 | पठाण हा चित्रपट शाहरुख खानसाठी खूप खास आहे. या चित्रपटामुळेच त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन झाले. अभिनेत्याला ॲक्शन अवतारात पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पठाणनंतर प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून त्याच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. आता किंग खानच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. सायरस बरुचा यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये, प्रसिद्ध पटकथा लेखक अब्बास टायरेवाला यांनी खुलासा केला की या चित्रपटाची स्क्रिप्ट जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि आता त्याच्या डायलॉगवर काम सुरु आहे. लवकरच शूटिंगला होणार सुरुवात असल्याची चर्चा आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलला हिरवा कंदील दिल्याच्या वृत्तादरम्यान, अब्बास यांनी पठाण 2 वर काम सुरू असल्याची पुष्टी केली आहे. ‘मला वाटते की स्क्रिप्ट संवादासाठी जवळजवळ तयार आहे.असेही त्याने सांगितले आहे. शाहरुख खान या चित्रपटात रॉ एजंट पठाणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी दीपिका पदुकोण रुबीनाच्या भूमिकेत परतण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटाचा सिक्वेल दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार नसल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. 2023 च्या सुरुवातीला पठाणने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आणि शाहरुख खानचे पुनरागमन केले. यानंतर पठाण 2 च्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. हा सिक्वेल YRF च्या विस्तारित गुप्तचर विश्वाचा भाग असेल. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान शेवटचा राजकुमार हिरानीच्या डंकी चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तो लवकरच ‘किंग’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहे. हेही वाचा । “हे सहन केले जाऊ शकत नाही…” ; तिरुपती प्रसाद प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांची सीबीआय चौकशीची मागणी 0000000000000000000