आज संपूर्ण जग प्लास्टीकमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. प्लास्टीक मायक्रो कण हवा, पाणी आणि अन्नातून आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजारी पाडत आहेत. हे कण जेव्हा मानवी शरीरात शिरकाव करतात खासकरुन फप्फुसात तेव्हा सुज,जळजळ आणि पेशींच्या समस्या निर्माण होतात. यामुळे आपल्याला फप्फुसाचे आजार होऊ शकतात. पतंजलीने शोधला आयुर्वेदिक उपाय पतंजलीच्या संशोधकांनी उंदरांवर एक नवीन प्रयोग केला. या प्रयोगातून हे स्पष्ट झाले की मायक्रोप्लास्टिकमुळे फुप्फुसाच्या कार्यक्षमता कमी झाली असेल तर या आयुर्वेदिक औषध ब्रोंकोममुळे हे चांगल्या प्रकारे हे रोकता येऊन रुग्णाला नवे जीवन मिळू शकते. ब्रोंकोममुळे मायक्रोप्लास्टीकमुळे होणारे फुप्फुसाच्या इन्फ्लेमेंशनसंबंधी मार्कर्स सारख्याला कमी करण्यास मदत होते. हे संशोधन जगप्रसिद्ध Elsevier प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल Biomedicine & Pharmacotherapy मध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनामुळे सनातन ज्ञान, पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष्यित संशोधन आणि पुराव्यावर आधारित औषधोपचाराद्वारे देखील उपचार केले जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे.