Passport Online Apply Process: परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पासपोर्टचा वापर ओळखपत्रासाठीही केला जातो. पासपोर्टशिवाय तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. मात्र पासपोर्ट काढण्याची किचकट प्रक्रिया आता बदलली आसून घसरबसल्या तूम्ही पासपोर्टसाठी अप्लाय करु शकता. आजकाल पासपोर्ट बनवणे खूप सोपे झाले आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करूना पासपोर्ट काढता येतो.
ऑनलाइन पासपोर्ट कसा काढायचा, अर्ज कसा करावा –
– पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात नोंदणी करावी लागेल. (https://passportindia.gov.in/)
– यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
– नवीन पासपोर्टसाठी तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
– फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला तो प्रमाणित करून सेव्ह करावा लागेल.
– आता तुम्ही SML मध्ये फाईल तयार करा.
– तुम्हाला XML फाईलमध्ये फॉर्म अपलोड करावा लागेल.
– फॉर्म अपलोड केल्यानंतर, तुम्हाला पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट निवडावी लागेल.
– आता तुमची भेटीची वेळ निश्चित करा. अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला तुमचे जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडावे लागेल.
– यानंतर तुम्हाला SBI चालानद्वारे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.
– पैसे भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
– यानंतर तुम्हाला मूळ कागदपत्रासह पासपोर्ट सेवा केंद्रात जावे लागेल.
– तुमचे दस्तऐवज पडताळणी पूर्ण झाल्यावर, तुमची पासपोर्ट अर्जाची विनंती मंजूर केली जाईल.
– यानंतर काही दिवसांनी तुम्हाला नवीन पासपोर्ट मिळेल.
पासपोर्ट बनवण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक –
जन्मतारीख प्रमाणपत्रासाठी: 10 वी गुणपत्रिका, जन्मतारीख प्रमाणपत्र, एलआयसी पॉलिसी बाँड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स.
पत्त्याच्या पुराव्यासाठी: पाणी बिल, रेशन कार्ड, पोस्टपेड मोबाइल बिल, वीज बिल, आयटीआर, भाडे करार, बँक पासबुक.