गाव बंद ठेवत ग्रामस्थ शेख कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग

ना. औटी, खासदार डॉ. सुजय विखे यांनी घेतली शेख कुटुंबीयांची भेट
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
दोन टेम्पो पकडले : एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – तालुक्‍यातील शिंगवे गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून टेम्पोसह त्यांच्या कडून 8 लाख 10 हजार रुपयांसह 1 ब्रास वाळू जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी (दि.6) सायंकाळी 5 वाजेदरम्यान शिंगवे गावच्या नदीपात्रात करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी पो. कॉ. राहुल सोळुंके यांच्या फिर्यादीवरून अशोक लेलंड टेम्पो वरील चालक रोहिदास गोरक्षनाथ करंडे (रा. देहेरे) व टेम्पो चालक (नाव व पत्ता माहीत नाही) या दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाळवणी – ढवळपुरी (ता. पारनेर) येथे गुरूवारी (दि.6) दुपारी एकाच कुटुंबातील तीन चुलत भावंडांचा काळू डॅम परिसरातील एका खासगी मालकीच्या शेततलावात पोहण्यासाठी उतरले असताना, त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे ढवळपुरी व परिसरात शोककळा पसरली. भाळवणी परिसरातूनही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. आज आठवडे बाजार बंद ठेवून ग्रामस्थ शेख कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले. तसेच विविध लोकप्रतिनिधींनी शेख कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले.

शेख कुटुंबातील तीन चुलत भावंडांचा एकाच वेळी अपघाती मृत्यू झाल्याने गुरूवारी रात्री उशिरा त्यांच्यावर येथील मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी असणारा आठवडे बाजार व संपूर्ण गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. शुक्रवारी (दि. 7) दुपारी खासदार डॉ. सुजय विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष ना. विजय औटी, सभापती राहुल झावरे, साई मल्टिस्टेटचे चेअरमन वसंत चेडे यांनी ढवळपुरी येथे जाऊन शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी, सरपंच डॉ. राजेश भनगडे, पोपट चौधरी, पोलीस पाटील अहमद पटेल व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.