Ganesh Visarjan 2025 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्याचे पहिले तीन मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड असते. सभा मंडपातून कसबा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड. या बँडचे वंदन ऐकण्यासाठी सर्वांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यासोबतच बाप्पाच्या निवणुकीत गंधर्व बँडने देखील गणरायाच्या गाण्याची धून वजानवून सर्वांना मंत्रमुग्ध केल्याचे दिसून येत आहे. Ganesh Visarjan 2025 | यानंतर आता पुण्यात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी गणेशभक्तांचा उत्साह देखील वाढलेला पाहायला मिळत आहे. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. Ganesh Visarjan 2025 | हेही वाचा: पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलगाम चौकात दाखल ; ताल वाद्य पथकाकडून वादन