Parth Pawar Oath Ceremony : पार्थ पवारांची ‘अजितदादा’ स्टाईल एन्ट्री; गुलाबी जॅकेटमध्ये घेतली खासदारकीची शपथ
Parth Pawar Oath Ceremony : Parth Pawar Oath Ceremony : पार्थ पवारांची 'अजितदादा' स्टाईल एन्ट्री; गुलाबी जॅकेटमध्ये घेतली खासदारकीची शपथ

Parth Pawar Oath : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज 9 एप्रिल रोजी राज्यसभेची खासदारकीची शपथ घेतली. याद्वारे आता पवार कुटुंबातील आणखी एक पिढी राष्ट्रीय पातळीवर काम करणार आहे.
संसद भवनातील अध्यक्षीय परिषद कक्षात, हा शपथविधी सोहळा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील पार्थ पवारांसोबत उपस्थित होते. Parth Pawar Oath Ceremony
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह एकूण १९ नवनिर्वाचित सदस्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी आपल्या खासदारकीची अधिकृत शपथ ग्रहण केली.
शरद पवार यांनी व्हीलचेअरवरून खासदारकीची शपथ घेतली (Parth Pawar Oath Ceremony)
प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांनी व्हीलचेअरवरून सभागृहात प्रवेश केला आणि त्याच स्थितीत खासदारकीची शपथ घेतली. वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही आणि शारीरिक मर्यादा असतानाही, लोकशाहीच्या कर्तव्याप्रती असलेली त्यांची ही निष्ठा पाहून सभागृहातील उपस्थित थक्क झाले.
तर दुसरीकडे आज पार्थ पवार यांनी देखील खासदारकीची अधिकृतरित्या शपथ घेतल्याने आता आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेवर कामकाज पाहणार आहेत. Parth Pawar Oath Ceremony
हेही वाचा:
Love and War Movie Update: ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर कडक नियम; संजय लीला भन्साळींचा फोन बॅन निर्णय चर्चेत





