मराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

Madhuvan

मुंबई – मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकही ठाकरे सरकारविरोधात आक्रमक टीका करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणासाठी विवेकच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावे आणि लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे, असे पार्थ पवार यांनी म्हंटले आहे.

विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे. त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसेच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, असेही पार्थ पवार यांनी सांगितले. आहे.

 

दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसनभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मात्र, आता पार्थ पवार यांनी आजोबांच्या उलट भूमिका घेतल्यानं पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात काही दिवसांपासून वादंग उठले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.