अकोट-शेगाव रोडवरील ब्रिटीशकालीन पूल खचला; टेम्पोचा अपघात

Updated On:
अकोट-शेगाव रोडवरील ब्रिटीशकालीन पूल खचला; टेम्पोचा अपघात

लोहारा(बाळापूर) : अकोट-शेगाव राज्यमार्गावर असलेला इंग्रजकालीन पूल खचला. या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान त्याचवेळी कोंबड्यांची वाहतूक करणारे एक वाहन पुलावरून जात होते. अचानक पुलाला भगदाड पडल्याने क्षणात आत वाहन खड्यात घसरून अधांतरी लटकले.यामध्ये सदर टेम्पो पुलावर एका बाजूला लटकला होता. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/503459764265742/

बाळापूर तालुक्यातील लोहारा गावानजीक हा प्रकार घडला आहे. येथील मन नदीवर असलेला सुमारे १०० वर्षांपुर्वीचा इंग्रजकालीन पूल खचला आहे.घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने हा टेम्पो बाहेर काढण्यात आला आहे.

जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. कंत्राटदाराने जुना पूल खोदून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

परिसरात कवठा बॅरेज तयार करण्यात येत असून नदीपात्रात जास्त पाणी थांबविल्या जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्याने जुना पूल खिळखिळा झाला. यामधूनच हा अपघात घडून आला आहे.

दरम्यान, या मार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! कंटेनरच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

2026-10-02 18:12:30

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! कंटेनरच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

Raigad : रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे; पोलिसांनी नावे केली जाहीर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

2026-10-01 21:26:05

Raigad : रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे; पोलिसांनी नावे केली जाहीर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा अपघात; गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल, परदेशातील मुक्काम वाढवला!

2026-10-01 17:50:11

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा अपघात; गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल, परदेशातील मुक्काम वाढवला!

Marine Drive accident : मरीन ड्राइव्हवर काळाचा घाला! ट्रेलरला कारची जोरदार धडक, मंत्र्याच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

2026-09-24 13:29:50

Marine Drive accident : मरीन ड्राइव्हवर काळाचा घाला! ट्रेलरला कारची जोरदार धडक, मंत्र्याच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

Accident: लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू

2026-09-22 08:14:46

Accident: लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू