Parminder Singh Jotta: पंजाबमध्ये परमिंदर सिंग झोट्टा यांची हत्या ; फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडल्या?
Parminder Singh Jotta: पंजाबमधील मानसामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मानसात अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात आवाज उठवणाऱ्या परमिंदर सिंग झोट्टा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Parminder Singh Jotta: पंजाबमधील मानसामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मानसात अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात आवाज उठवणाऱ्या परमिंदर सिंग झोट्टा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
परमिंदर सिंग यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा साथीदारही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार एका मेडिकल स्टोअरमध्ये झाला. मेडिकल स्टोअरचा मालक, अश्विनी कुमार, याच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, झोट्टा यांचा जखमी साथीदार त्यांच्यासोबत औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला होता.
परमिंदर सिंग गेल्या काही वर्षांपासून पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात, विशेषतः मादक गोळ्या विकणाऱ्या औषधांच्या दुकानांविरोधात मोहीम चालवत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती, ज्याने कथितरित्या त्या दुकानातून अमली पदार्थ खरेदी केले होते.
परमिंदर सिंग यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परमिंदर सिंग झोट्टा औषधांच्या दुकानात गेले होते. गोळी लागली तेव्हा ते फेसबुकवर लाईव्ह होते.
काँग्रेस नेते राजा वारिंग यांनी दुःख व्यक्त केले Parminder Singh Jotta:
काँग्रेस नेते अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी परमिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, “परमिंदर सिंग झोटा यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या ही अयशस्वी कायदा आणि सुव्यवस्था तसेच अयशस्वी ‘ड्रग्ज विरोधी युद्ध’ धोरणाचा थेट परिणाम आहे.”
ते मुख्यमंत्री भगवंत मान यांना म्हणाले, “परमिंदर यांनी पंजाबमधील ड्रग्जच्या समस्येविरोधात आवाज उठवला होता, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना कधीही सरकारी पाठिंबा मिळाला नाही. दिवसाढवळ्या झालेली त्यांची हत्या ही आम आदमी पार्टी सरकारचे गंभीर अपयश उघड करते.”
राजा वारिंग पुढे म्हणाले, “माझ्या मनःपूर्वक संवेदना त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांसोबत आहेत. २०२३ मध्ये जेव्हा परमिंदर यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती, तेव्हा मी त्यांच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना थोडक्यात भेटलो होतो. या कठीण काळात वाहेगुरु त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो.”
अकाली दलाचे बिक्रम मजीठिया यांनीही प्रश्न उपस्थित केले Parminder Singh Jotta:
अकाली दलचे महासचिव बिक्रम माजिठिया यांनी प्रश्न विचारला, “अंमली पदार्थ विरोधी कार्यकर्ते परमिंदर सिंग झोटा यांची थेट प्रक्षेपण सुरू असताना हत्या करण्यात आली. ते कॅमेऱ्यासमोर थेट अंमली पदार्थांच्या तस्करांचे वार्तांकन करत असताना, चिट्टा विकणाऱ्या एका मेडिकल दुकानाच्या मालकाने त्यांच्यावर गोळी झाडली.
मानसा याठिकाणी अंमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंज देत असलेल्या झोटा यांना गोळी मारण्यात आली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चिट्टा (हेरॉईन) बद्दल प्रश्न विचारले जात आहेत.”
बिक्रम माजिठिया पुढे म्हणाले, “मोहनजीत शेरॉन असोत किंवा गुलजार सिंग, संपूर्ण पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात आवाज उठत आहेत. या वर्षी आतापर्यंत पाच पोलिसांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाब कोणत्या दिशेने जात आहे? पण तथाकथित ‘गुरु डाक्की’चे हस्तक हे आवाज दाबून टाकू इच्छितात. पंजाबची हीच अवस्था झाली आहे.”






