पुणे : Maharashtra Assembly Election 2024 – परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या निर्मितीबाबात संभाजी राजे म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी सत्ता भोगली आहे. मात्र आजही आपण केवळ मूलभूत प्रश्नांवरच चर्चा करत आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे लाँग टर्म व्हिजन बॉन्ड प्रोग्राम पहायला मिळत नाही. त्यामुळेच परिवर्तन महाशक्ती आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चांगले उमेदवार आमच्या दररोज संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. मतदारसंघ उमेदवाराचे नाव आणि पक्ष – *अचलपूर – ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) *रावेर यावल – अनिल छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ती पक्ष) * चांदवड – गणेश रमेश निंबाळकर (प्रहार जनशक्ती पक्ष) * देगलूर बिलोली (SC) – सुभाष साबणे (प्रहार जनशक्ती पक्ष) *ऐरोली – अंकुश सखाराम कदम (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) * हदगाव हिमायतनगर – माधव दादाराव देवसरकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) * हिंगोली – गोविंदराव सयाजीराव भवर (महाराष्ट्र राज्य समिती) * राजुरा – वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) दरम्यान, शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून 66 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता, यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.