Paris Olympics 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूचा निराशाजनक पराभव, पदकांच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न राहिले अधुरे…

Paris Olympics 2024 (Badminton) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटनमध्ये उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी.व्ही. सिंधूला 21-19, 21-14 ने पराभव स्वीकारावा लागला. तिला पराभूत करून चीनची ॲथलीट बिंग जाओ हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यासह सिंधूचा 2024च्या ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. याआधी सिंधूने पॅरिसमध्ये सलग दोन सामने जिंकले होते.
पीव्ही सिंधू आणि ही बिंग जाओ यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. सिंधूने पहिला गेम 21-19 अशा फरकाने तर दुसरा गेम 21-14 अशा फरकाने गमावला.
P V Sindhu eliminated in Pre-QF.
#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Badminton pic.twitter.com/0hfgSXtvGX
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 1, 2024
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू बुधवारी पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या 16 व्या फेरीसाठी महिला एकेरीत गट ‘एम’ मध्ये अव्वल स्थान मिळवून पात्र ठरली. तिने दुस-या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाचा 21-5, 21-10 असा पराभव केला होता तर पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमथ नबाहा अब्दुल रज्जाकचा 21-9,21-6 असा पराभव केला होता.





