Paris Olympics 2024 (Badminton Men’s Singles) : लक्ष्य सेनची एकेरीत आगेकूच…

Paris Olympics 2024 (Badminton,Men’s singles) : महाकुंभ ऑलिम्पिकचे यजमानपद यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराला देण्यात आले असून, त्यामध्ये 26 जुलै रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर आता 27 जुलैपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. लक्ष्यने पुरुष एकेरीच्या गट साखळी मधील पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनचा 21-08,22-20 असा पराभव केला.
🇮🇳Update: BADMINTON MEN’S SINGLES GROUP STAGE Results 👇🏼
Eyes on the prize!! Lakshya sab ka ek hai🔥☑️ That’s some way to make your #Olympics debut😍
Shuttler 🏸@lakshya_sen overcomes 🇬🇹Guatemala’s Kevin Cordon 21-8, 22-20 in his first outing at #ParisOlympics2024!@BAI_Media pic.twitter.com/JXCTUSCKWd
— SAI Media (@Media_SAI) July 27, 2024
लक्ष्यने पहिला गेम सहज जिंकून कॉर्डनला संधी दिली नाही. मात्र, कॉर्डेनने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी लक्ष्यने पुनरागमन करत हा गेम एकतर्फी जिंकला. दुसऱ्या गेम मध्ये केविनने लक्ष्यची चांगली परीक्षा बघितली.
Paris Olympics 2024 (Table Tennis) : हरमीत देसाईने विजयासह केली मोहिमेची सुरुवात…
17-20 ने मागे असताना लक्ष्यने सलग 5 गुण जिंकून सामना आपल्या नावे केला. आता 29 जुलै रोजी बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागी विरुद्ध लक्ष्य सेनची पुढील गट टप्प्यातील लढत होणार आहे.





