Paris Olympics 2024 : सुंदर पण आणि तितकाच कठीण प्रवास, बचावातील चुकांवर नियंत्रण ठेवायला हवे होते – सिंधू

पॅरिस – ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र चीनच्या बिंग जाओने छान लढत दिली. मात्र, माझ्याकडून खेळताना काही चुका झाल्या. त्या चुकांवर नियंत्रण ठेवायला हवे होते, अशी भावना भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर व्यक्त केली. सिंधूला उपउपांत्यपूर्व चीनच्या बिंग जिओविरुद्ध पराभव स्वीकारला लागला.
आम्ही दोघीही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो. प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळत होतो. मात्र, तुम्ही प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळाले नाही, हे दुर्दैव आहे. असे बोलताना सिंधू म्हणाली.
Paris 2024: A Beautiful Journey but a Difficult Loss ❤️
This loss is one of the hardest of my career. It will take time to accept, but as life moves forward, I know I will come to terms with it.
The journey to Paris 2024 was a battle, marked by two years of injuries and long… pic.twitter.com/IKAKu0dOk5
— Pvsindhu (@Pvsindhu1) August 2, 2024
पहिल्या गेममध्ये सिंधू आणि तिची प्रतिस्पर्धी बिंग 19-19 अशी बरोबरी होती. खेळ कोणत्याही क्षणाला कोणाकडेही झुकू शकत होता. 19-19 अशी संधी असून देखील सिंधूला संधीचे विजयात रूपांतर करता आले नाही. हा विजय साकारला असता, तर तिसरे ऑलिम्पिक पदक मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असत्या. पुढील ऑलिम्पिक स्पर्धा अमेरिकेत घेण्यात येणार आहे. त्या स्पर्धेसातही अजून चार वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. सध्या मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. कदाचित थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सुरुवात करणार आहे. चार वर्ष हा मोठा कालावधी असल्याचे सिंधूने बोलताना सांगितले.
आतापर्यंतचा प्रवास खूप छान पण तितकाच कठीण होता. अनेक चढ-उतार अनुभवता आले. दुखापतीतून सावरले आणि सर्व काही चांगले होते. असे असले तरी प्रत्येक स्पर्धा ही वेगळी असते. विजयासाठी कसोशीने प्रयत्न करावेच लागतात. त्यामुळे प्रत्येक आपण वेळी विजयाची अपेक्षा करू शकत नाही. असे देखील पी. व्ही. सिंधूनं सांगितले.





