परिणिती चोप्रा वॉटर स्पोर्टसची दीवानी

अभिनेत्री परिणिती चोप्रा ही वॉटर स्पोर्टसची दीवानी आहे. सुट्टी मिळाली की समुद्र किनारा गाठायचा असा तिचा ठरलेला प्लॅन असतो. अनेकदा व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून देखील ती वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये देखील परिणिती आपल्या या अडव्हेंचरस हॉबीचे फोटो शेअर करते.
अशातच परिणिती जागतिक जागतिक महासागर दिनाचे औचित्य साधत नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामधे तिने आपल्याला एक छोटे जहाज, बिकिनी आणि डाईव्ह कम्प्युटर मिळाल्यास इतर काहीही नको असं म्हटलंय.
या फोटोमध्ये परिणिती एका बोटीमध्ये बसल्याच दिसून येत असून तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. डोळे मिटून बसलेल्या या फोटोत परिणिती चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहताना दिसतंय. यापूर्वी देखील परिणिती अनेकदा वॉटर स्पोर्टसबाबत तिला असलेली आवड चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये तिने, मी समुद्र सफर करत असताना बोटीवर केवळ तेव्हाच थांबते जेव्हा मला फोटो काढायचे असतात असा संदेश लिहला होता.
मध्यंतरी परिणिती स्कुबा डायव्हिंग करतानाच एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ती डायव्हिंग सूटमध्ये समुद्रात खोलवर गेल्याच दिसतंय.
परिणिती वर्क फ्रंटबाबत बोलायचं झाल्यास ती सध्या उंचाई, चमकीला व व ऍनिमल या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. उन्ची व चमकीला हे चित्रपट २०२२ मध्ये तर ऍनिमल पुढील वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.



